काय सांगता..! बोकड कापण्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- बोकड कापण्याच्या कारणावरून चार जणांनी संगनमत करून एका तरूणाला बोकड कापण्याची सुरी, कुऱ्हाड व लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ही घटना राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे घडली.सलमान नसीर सय्यद (वय १९, रा. कानडगाव, ता. राहुरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

या तरूणाने म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे वरील चौघांनी बोकड कापण्याच्या कारणावरून सलमान सय्यद याला बोकड कापण्याची सुरी, कुऱ्हाड व लाकडी दांड्याने जबरदस्त मारहाण केली आणि त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेत सलमान सय्यद हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी प्रवारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सलमान नसीर सय्यद याने लोणी पोलीस ठाण्यात दिलेला जबाब राहुरी पोलिस ठाण्याला प्राप्त झाल्यानंतर आरोपी कासमभाई सत्तारभाई सय्यद, शकील कासमभाई सय्यद,

हरून कासमभाई सय्यद, मोसिन कासमभाई सय्यद (सर्व रा. कानडगाव) या चार जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत.

Advertisement