अहमदनगर बातम्या

Ahmednagar ST Bus Accident : अहमदनगर एसटी बसचा अपघात ! एसटी बस उलटली, अनेक शालेय विद्यार्थी जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar ST Bus Accident : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कदायक अशी बातमी समोर आली आहे, संगमनेर तालुक्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एका बसचा एक्सेल तुटल्याने अपघात होऊन बस उलटली आहे.

राहुरीहून संगमनेरकडे जाणारी एसटी महामंडळाची बस एक्सल तुटल्याने उलटली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सर्व मुले थोडक्यात बचावली.

ही घटना आज, मंगळवारी सकाळी तालुक्यातील पिंपरणे गावाजवळ घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही शालेय विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

किरकोळ जखमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरातील रुग्णालयात उपचारांसाठी पाठवलेले आहे. पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आज सकाळी संगमनेर मधील या बसमधून विद्यार्थी प्रवास करत होते, अशी माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे घटनास्थळी असून, स्थानिक नागरिक देखील मदतीसाठी तातडीने पोहोचले. पोलीस पुढील तपास करत आहे. असेही उपविभागीय पोलीस अधिकारी वाघचौरे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office