अहमदनगरचा रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट ! डबल लाईन अंतर्गत बेलवंडी ते विसापूर चाचणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : बेलवंडी ते विसापूर डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत बेलवंडी ते विसापूर १५ कि.मी. अंतराची चाचणी गुरुवारी (दि.९) घेण्यात आली. लवकरच नगर ते दौडपर्यंतचे हे काम पुर्ण होणार असून यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

या पुर्ण मार्गात इलेक्ट्रिक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासुन नगर ते दौंड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.नगर ते मनमाडमधील ९६ कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली असून मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपुर्ण टप्पा येतो.

मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. त्यामुळे तासनतास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबुन ठेवावी लागत.

मात्र आता हा पुर्ण मार्ग डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी १२० प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे.

तीन वर्षापासुन हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंडपर्यंत काम पुर्ण होणार आहे. गुरुवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते दौडपर्यंतचा टप्पा पुर्ण होण्यास अजुन एक वर्ष लागतील असा अंदाज उपमुख्य अभियंता प्रदीप बनसोडे यांनी सांगितले.