अहमदनगर बातम्या

अहमदनगरकर इकडे लक्ष द्या ! विनाक्रमांक किंवा फॅन्सी क्रमांक लावून वाहन चालवत असाल तर…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : विनाक्रमांक किंवा फॅन्सी क्रमांक लावून वाहन फिरणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांची ‘अॅक्शन’, ‘रिअॅक्शन’ आणि ‘सोल्यूशन’, अशी त्रिसूत्री कारवाई सुरू केली आहे. अशा प्रकारची कारवाई राज्यात पहिल्यांदा झाली आहे.

उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या या कारवाईची सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

दुचाकीवरून येत लुटीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. गुन्हेगारांची शोध घेण्यासाठी वाहनांवरील क्रमांक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे गुन्हा घडला की पहिले वाहन आणि त्यानंतर त्याचा क्रमांक पोलिसांकडून तपासला जातो.

परंतु अलीकडच्या काळात विनाक्रमांक दुचाकी, फॅन्सी नंबर प्लेटच्या दुचाकींची संख्या वाढली आहे. याशिवाय गुन्हेगारी देखील वाढली आहे. पोलिसांकडून उपाययोजना होतात. परंतु ठोस असे काही साध्य होत नाही. मात्र पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी विनाक्रमांक, फॅन्सी नंबर प्लेटवर ‘अॅक्शन’, ‘रिअॅक्शन’ आणि ‘सोल्यूशन’, अशी त्रिसूत्री कारवाई सुरू केली आहे.

कारवाईतील ही त्रिसूची म्हणजे, विनाक्रमांक आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर ‘अॅक्शन’ घेत कारवाई करायची. ती वाहने ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणायची. या कारवाईनंतर ‘रिअॅक्शन’ म्हणजेच, विनाक्रमांक किवा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनाची कागदपत्रे तपासत दंडात्मक कारवाई करायची.

यानंतर पुढचा भाग महत्त्वाचा ठरतो. पूर्वी पोलीस दंडात्मक कारवाई करून वाहन सोडून दिले जायचे. परंतु पोलीस यादव यांच्या या त्रिसूत्री कारवाईतील ‘अॅक्शन’, ‘रिअॅक्शन’ नंतरचा पुढचा टप्पा महत्त्वाचा ठरतो, तो म्हणजे ‘सोल्यूशन’ !

दंडात्मक कारवाईनंतर या वाहनांवर कोतवाली पोलिसांनी सरकारच्या नियमाप्रमाणे नंबर प्लेट बसवून दिली गेली. कोतवाली पोलिसांनी आज पहिल्या दिवशी अशा ४२ वाहनांवर कारवाई केली. विनाक्रमांक आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई, दंड आणि नियमानुसार वाहनाच्या पुढे आणि मागे नंबर प्लेट बसवून दिली आहे.

या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नऊ पथके तयार केली होती. या पथकांनी कारवाई करत वाहन पोलीस ठाण्यात घेऊन यायचे. पोलीस ठाण्यात पथक वाहनांची कागदपत्रे तपासणार आणि त्यावर लगेचच पुढची कारवाई होणार, अशी ही कार्यपद्धती होती.

या कारवाईत वाहनचालकांना १९,५०० रू दंड आकारण्यात आला. विनाक्रमांक आणि फॅन्सी नंबर प्लेट वाहनांवर बसून येत लुटीचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी नगर शहरात ही त्रिसूत्री कारवाईची मोहीम राबवण्यात आली. आज ४२ वाहनांवर कारवाई झाली असून, या वाहन चालकांनी नंबर प्लेटमध्ये छेडछाड केल्यास पुढे फौजदारी कारवाई करू.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office