अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो पाणी जपून वापरा ! मुळा, भंडारदरात ‘इतकाच’ राहिला पाणीसाठा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर जिल्ह्यासाठी भंडारदरा, मुळा ही धरणे जीवनदायिनी आहेत. शेती असो की पिण्याचे पाणी सर्वच गरजा ही धरणे पूर्ण करत असतात. परंतु यंदा पाणी जपून वापरण्याची गरज आहे. कारण या धरणामध्ये सध्या पाणीसाठा बराच कमी झाला आहे. अहमदनगरमध्ये यंदा कमी पाऊस पडल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यावरच सध्या सगळी भिस्त आहे.

तसेच कमी पवासने धरणामध्येही पाणी कमीच होते. धरणांतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ऐन उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल असे चित्र आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे तज्ज्ञ म्हणतायेत.

किती राहिलाय पाणीसाठा

जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. मुळा व भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातही गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला, त्यात यावर्षी समन्यायी पाणीवाटप कायद्याची अंमलबजावणी करत मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे मुळा व भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात घट झाली असून, सध्या मुळा धरणात ६२ तर भंडारदरा धरणात ५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा ६२ इतका जलसाठा आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत.

जुलै अखेर पुरेल पाणी

मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळा धरणात जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढे पाणी रास्खीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही. परंतु, तरीही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागेल असे त्यांचे म्हणणे आहे.

टँकरचेरीज भाव वाढले

नगर शहरासह ग्रामीण भागात ज्यावेळी पाण्याची अडचण येते तेव्हा सर्रास खासगी टँकरने पाणी घेतले जाते. याचे भाव देखील जास्त असतात. सध्या ५०० ते ७०० रुपये इतके दर साधारण ५ हजार लिटर टँकरचे आहेत. उन्हाळ्यातही साधारण हेच दर असतात.

काटकसर करा अन्यथा टंचाई

यंदा पाणीसाठा कमी असल्याने सर्वांनाच काटकसरीने याचा वापर करावा लागणार आहे. अन्यथा पाणी टंचाईचा सामना करावा लागेल यात शंका नाही.

Ahmednagarlive24 Office