अहमदनगर बातम्या

अहमदनगरच्या वाद्यांना सातासमुद्रापार मागणी , नगरमधील हार्मोनिअमलाच अमेरिकेत पसंती

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे प्रत्येक क्षेत्रात मोठे नाव आहे. सांस्कृतिक असो किंवा ऐतिहासिक, भौगोलिक असो किंवा अगदी आताचे फिल्म करिअर असो यात अहमदनगर जिल्ह्याचा मोठा ठसा राहिला आहे. अगदी जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींत देखील अहमदनगरचा ठसा उमटलेला आहे.

* वाद्य क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी, परदेशातून वाद्यांना मोठी मागणी

अहमदनगर जिल्ह्याची संगीत क्षेत्रामधील कामगिरी देखील उत्तम आहे. अहमदनगर जिल्ह्यात तयार होत असलेल्या सागवानी लाकडापासून बनविलेल्या हार्मोनियमला अमेरिकेत प्रचंड मागणी वाढली आहे.

जवळपास मागील २० वर्षांपासून या वाद्याची निर्यात केली जात आहे. अनेक तांत्रिक गोष्टी विचारात घेऊन हार्मोनियम बनविले जाते. बाजारात जे उपलब्ध हार्मोनियम आहेत त्यातील बहुतांश पुठ्ठ्यापासून बनविलेले आहेत. या दिसायला अत्यंत आकर्षक आहेत. परंतु टिकाऊपणा मात्र अत्यंत कमी आहे.

* जुन्या सागवानी लाकडापासून हार्मोनिअम

सागवान लाकडापासून बनविलेल्या हार्मोनियममधील आवाज उत्तम येतो. त्या सुमारे ३० वर्षांपर्यंत टिकून राहतात. ४४ पट्टीच्या, पावणेचार सप्तक, सव्वातीन सप्तक, तसेच साडेतीन सप्तकाच्या या हार्मोनियम पाहायला मिळतात.

पॅरीस सूर, जर्मन सूर या प्रकारचे सूर यामध्ये तयार केलेली असतात. याची किंमत म्हणाल तर जास्त असते. सागवान असल्याने याची किंमत नऊ हजारांपासून एक लाखांपर्यंत जाते. जामखेड, पुणे यांसह महाराष्ट्रातील बहुतेक गावांत नगरच्या हार्मोनियम दिसतात. नगरमध्ये जी वाद्ये तयार होतात त्यांनाच भजनी मंडळांकडून पहिली पसंती दिली जाते.

‘ या वाद्यांचा ‘असा’ आहे इतिहास

१९ व्या शतकाच्या पूर्वार्धात हार्मोनियम बनविण्याचे विविध प्रयोग झाले. १८३३ मध्ये इंग्लंडमधील जॉन ग्रीन कंपनीने प्रायोगिक तत्त्वावर हे वाद्य बनविल्याचे बोलले जाते. त्यानंतर फ्रान्समध्ये याबाबत प्रयोग केले गेले. पण १८४० मध्ये या वाद्याला मूर्त स्वरूप आलेक्सांद्र डेबिन याने दिले. १९१५ पर्यंत भारत हा वाद्याचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश होता असे सांगितले जाते.

नगरमधील हार्मोनियम उत्पादक सांगतात की, हार्मोनियममधून चांगला सूर निघणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी लागणारे साहित्य चांगल्या दर्जाचेच लागते. नगरचे उत्पादक यामध्ये तडजोड करीत नसल्याने नगरच्या वाद्यांची परदेशात मागणी वाढू लागली आहे असे ते सांगतात.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office