अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगरमधील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अध्यक्ष जे.पी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच नोटीस पाठवली आहे. तालुका कार्यकारिणीच्या निवडीवरून नाराज असल्याने ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
तालुका स्तरावरील वादात चक्क राष्ट्रीय अध्यक्षालाच नोटीस पाठवल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अहमदनगरमधील भाजप कार्यकर्ते सुनील पाखरे आणि नवनाथ गर्जे यांच्या वतीने अॅड. दिनकर पालवे
यांनी नोटीस पाठवली आहे. हा असला प्रकार भाजपमध्येच काय, देशाच्या राजकारणातही हे पहिल्यांदाच घडला असावा. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.
भाजपची पाथर्डी येथील तालुका कार्यकारिणीची निवड १९ जुलै रोजी करण्यात आली. परंतु ही निवड पक्षाच्या घटनेच्या विरोधात असल्याचा आक्षेप घेत एका गटाने थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस पाठवली आहे.
कारवाई न केल्यास न्यायालयात जाण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे. ही नोटीस नड्डा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,
जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, पाथर्डीचे मंडल अध्यक्ष माणिक खेडकर, पाथर्डी-शेवगाव मतदार संघाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनाही देण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com