अहमदनगर बातम्या

अहमदनगरच्या लघुपटाचा राष्ट्रीय पुरस्कारात डंका

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News: अहमदनगरमधील अनुष्का मोशन पिक्चर्स निर्मित ‘कुंकुमार्चन’ या लघुपटाला ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात स्थान मिळाले आहे.

मराठी भाषेतील नॉन-फिचर फिल्म श्रेणीतील ‘कुंकुमार्चन’ला कौटुंबिक मूल्यांवर आधारित सर्वोत्तम चित्रपटाचा मान मिळाला आहे. आज दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली.

‘कुंकुमार्चन’ लघुपटासाठी नाट्य-सिनेमा लेखक अभिजीत दळवी यांचे दिग्दर्शन, कौस्तुभ केळकर यांची कथा आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांची निर्मिती आहे. या लघुपटाला यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Ahmednagarlive24 Office