अहमदनगरच्या ‘ह्या’ सुपुत्राचे यूपीएससी परीक्षेत यश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :-2019 मध्ये झालेल्या राष्ट्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (4 ऑगस्ट) लागला. या परीक्षेत अहमदनगरच्या सुपुत्राने घवघवीत यश संपादन केले.

अभिषेक दिलीप दुधाळ असे या विद्यार्थ्यांचे नाव असून तो श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील रहिवासी आहे. त्याने या निकालात देशात 637 वा क्रमांक पटकावला. डहाणूकर विद्यालयाचे शिक्षक दिलीप दुधाळ यांचा तो मुलगा आहे.

अभिषेकचे इयत्ता 4 थी पर्यंत प्राथमिक शिक्षण बेलापूर शिक्षण संस्थेच्या शेठ रामधनजी खटोड इंग्लीश मीडियम स्कुलमध्ये तर 10 वी ते 12 वी माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण जे. टी. एस. हायस्कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये पूर्ण केले.

त्यांनतर त्याने मुंबई येथील व्ही.जे.आय.टी मध्ये बी. टेक पूर्ण केले. त्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असा निधार करून त्याने दिल्लीतील जेएनयू विद्यापिठात एम.ए.अर्थशास्त्र शाखेला प्रवेश घेतला. तेथेच त्याने परीक्षेसाठी क्लासही केले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24