Ahmednagr News : साखरझोपेत असताना पहाटेच बिबट्याने चिमुरडीस ओढत नेले, मुलीच्या मृत्यूने गाव हळहळले

Ahmednagarlive24 office
Published:
bibatya

Ahmednagr News : पोटासाठी, पशुधन जगवण्यासाठी पळापळ..त्यातच एका शेतात मेंढराचा वाडा टाकलेला…पहाटेच्या सुमारास बिबट्या येतो व पोटच्या गोळ्यास चिमुरड्या मुलीस उचलून नेतो…या हल्ल्यात मुलगी ठार होते..

या घटनेनंतर कुटुंब हंबरडा फोडते..अन गावावरच शोककळा पसरते.. ही हृदयद्रावक घटना घडली आहे शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथे. हे कुटुंब आहे पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील येथील..

अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील धनगर मेंढपाळ समाज आपल्या कुटुंबीयांची व पशुधनाची उपजीविका भागविण्यासाठी बाहेर ठिकाणी जात असतात. सात ते आठ महिने तालुका सोडून इतर ठिकाणी त्यांना जावे लागते.

अशाच प्रकारे धोत्रे गावातील रहिवाशी संजय कोळेकर हे आपले पशुधन घेऊन शिरोली खुर्द (ता. जुन्नर) येथे आपल्या वृद्ध आई, पत्नी व छोटी दीड वर्षाची मुलगी संस्कृती हिस घेऊन एका शेतात आपला मेंढराचा वाडा टाकून रहात होते.

गुरुवारी पहाटे पाच वाजता झोपेत असताना बिबट्याने चिमुकली संस्कृतीस झोपेच्या अवस्थेत उचलून नेले. या हल्ल्यात ती ठार झाली. त्यानंतर कुटुंबाने हंबरडा फोडला. ही घटना गुरुवारी (ता. ११) रात्री घडली.

तातडीने वनविभागाने कोळेकर कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत दिली. वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यात १५ लाख रुपये तातडीने संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले, तर उर्वरित १० लाख रुपये लवकरच देण्यात येणार आहेत, अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.

दरम्यान अशा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. ग्रामीण भागात तर या घटनांनी मोठी भीती निर्माण केली आहे. ग्रामीण तर ग्रामीण पण आता शहरी भागातही अशा घटना घडत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe