Ahmedngar News : दीड वर्षाच्या चिमुकलीस बिबट्याने ओढत उसात नेले, पोटचा गोळा मृत झालेला पाहून पालकांनी फोडला हंबरडा

Ahmednagarlive24 office
Published:
Leopard Attack

Ahmedngar News : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाची मुलगी मृत्युमुखी पडल्याची घटना जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथे घडली. शिरोली खुर्द येथे चार वर्षांपूर्वी उदरनिर्वाह करण्यासाठी पारनेर तालुक्यातील धोत्रे येथून आलेले धनगर कुटुंबातील संजय मोहन कोळेकर यांचा संपत केरू मोरे यांच्या शेतावर मेंढ्यांचा वाडा होता.

गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दबा धरलेल्या बिबट्याने एका दीड वर्षाच्या संस्कृती संजय कोळेकर या चिमुरडीला जबड्यात पकडून उसाच्या शेतात धूम ठोकत ठार मारले. दरम्यान, घटनास्थळी कोळेकर कुटुंबियांनी हंबरडा फोडला.

या नरभक्षक बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात आली. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संस्कृती संजय कोळेकर यांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत मिळावी तसेच वनविभागाने परिसरातील नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या बिबट्याच्या हल्ल्याने हे कुटुंब पूर्ण हतबल झाले आहे. कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्यासह वन व पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अहमदनगर जिल्ह्यात विविध दुर्घटना अलीकडील काळात झालेल्या पाहायला मिळालेल्या आहेत.

यात ग्रामीण भागात अशा घटना सर्रास घडत आहेत. बिबट्याचा हल्ला आता ग्रामीण भागासह शहरातील लोकांनाही नवीन राहिला नाही. नुकतेच केडगाव मध्ये बिबट्याने दिवसभर धुमाकूळ घातल्याची घटना नुकतीच घडून गेली होती. अगदी नगर शहरात देखील बिबट्या पाहण्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे आता नागरिक व वनविभागाने एकत्रित येत काही उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe