अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- ऐन उन्हाळयात पाण्याची तीव्र टंचाई असताना वळण ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गेल्या पाच दिवसापासून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.
तर दुसरीकडे नळ धारकांना पिण्याच्या पाण्यासाठी रात्र रात्र जागून पाणी भरण्याची वेळ आली आहे. याबाबत सरपंच आणि ग्रामसेवक दोघेही आपली जबाबदारी झटकून मोकळे झाले आहे. त्यामुळे या पाणीगळतीला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.
गावातील वार्ड नंबर ४ मधील आंबेडकर चौकातील पिंपरी रस्त्यालगत असलेल्या ग्रामस्थांना गेल्या कित्येक महिन्यापासून स्वच्छ व पुरेसे पाणी येत नाही. या वार्ड मधून निवडून आलेल्या महिला सदस्याने मी तो प्रश्न सोडवेल,असा शब्द निवडणूक काळात दिला होता.
त्यानुसार काम सुरू करून नवीन पाईपलाईन टाकली. दरम्यान जुन्या पाईप लाईनवरील काही कनेक्शन तुटल्याने नळ धारकांना पाणी येणे बंद झाले.पण नवीन पाईप लाईन मधून सर्वांना पाणी येईल म्हणून कोणी ओरड केली नाही. पण अद्याप तीही चालू केले नाही.
त्यामुळे गेल्या आठ दिवसापासून नळधारकांना रात्र-रात्र जागून पाणी आणावे लागते. याबाबत सरपंचांना विचारणा केली असता, सदर फाटयावरील नळकनेक्शन ग्रामपंचायतीचे नसून, वैयक्तिक नळ धारकांचे आहे. ग्रामपंचायतीचे पाईप लीकेज नाही.
खातेदारांनी लिकेज काढून घ्यावे. ग्रामसेवक म्हणतात, ते वैयक्तिक कनेक्शन आहे. त्याच्याशी ग्रामपंचायतीचा संबंध नाही. मग ग्रामस्थांनी ज्यावेळी नळ कनेक्शन घेतले त्यावेळी ग्रामपंचायतीने त्यांच्याकडून डिपॉझिट घेतले नाही का? घेतले तर दुरुस्तीची जबाबदारी कोणाची?
याच फाटयावरील नळ धारकांना पाणीपट्टीसाठी धारेवर जाते. इतरांकडे पाणीपट्टी नाही का? याचा खुलासा करावा. अन्यथा या भागातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन ग्रामपंचायतीला जमा विचारल्याशिवाय राहणार नाही.असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे