Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

‘त्या’ माजी आमदाराची किमया!सलग तिसऱ्यांदा झाले कारखान्याचे चेअरमन..!

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आ.राहुल जगताप यांची तर उपाध्यक्षपदी विवेक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कुकडी कारखान्यावर पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी माजी आमदार राहुल जगताप यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी विवेक पवार यांचा एकमेव अर्ज आला

त्यामुळे निवडणूक निर्णायक अधिकारी यांनी दोघांना बिनविरोध घोषित करताच उपस्थित सर्व संचालकांनी तसेच सभासदांनी एकच जल्लोष केला.

यावेळी बोलताना कारखाना अध्यक्ष माजी आमदार राहुल जगताप म्हणाले कुकडी सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांची कामधेनु आहे.

कुकडीचे संस्थापक स्व. तात्यानी कुकडीत कारभार करताना सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सभासदांनी सर्व संचालकांवर टाकलेल्या विश्वासास पात्र राहण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन शेतकरी हिताचा निर्णय घेऊ.

कारखान्याच्या माध्यमातून सभासद हिताचे उपक्रम राबविणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार राहुल जगताप यांनी सांगितले.