अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासनाने चांगलची कंबर कसली आहे. नुकतेच नेवासा तालुक्यात दारूच्या अड्ड्यांवर टाकलेल्या धाडसत्रात जप्त दारू नष्ठ करण्यात आली आहे.
नेवासे बेकायदेशीर दारूविक्रीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या २१ हजारांच्या दारूच्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व उपअधीक्षक सूर्यदर्शन मुंडे यांच्या आदेशाने २०२० मध्ये दाखल दारूबंदीच्या ३३ गुन्ह्यांमधील नष्ट करण्यात आली. यामध्ये देशीबरोबरच विदेशी दारूच्या ५७८ बाटल्या होत्या.
यावेळी नेवासे पोलिस ठाण्याचे प्रभारी त्यागी, सहायक फौजदार सुरेश शिंदे, पोलिस नाईक सुहास गायकवाड, किरण गायकवाड, दादा गडाख व पंच बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
दारूची विल्हेवाट लागली, पण पोलिस ठाणे, तहसील कार्यालय आणि पोलिस लाइनच्या आवारात जप्त केलेल्या व बेवारस वाहनांचा मोठा खच पडला आहे. या वाहनांची कधी विल्हेवाट लावणार, असा प्रश्न आहे.