अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथील जोगेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अवैध दारू धंद्याबाबत अनेक वेळा तोंडी, लेखी निवेदन देवूनही गावातील अवैध दारूविक्रीवर पोलीसाकडून कारवाई करण्यास दुर्लक्ष केले जात होते.
यामुळे संतप्त झालेल्या जोगेवाडी येथील महिलांनी सरपंच यांच्या पुढाकाराने सर्वच महिलांनी दुर्गावतार धारण करून स्वतःच अवैध दारू पकडून पाथर्डी पोलिसांना दिली. पोलिसांना वारंवार तोंडी, लेखी निवेदन देवूनही गावातील अवैध दारूविक्रीवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अखेरिस जोगेवाडीच्या रणरागिणींनी दुर्गावतार धारण केला.
त्यांनी गावातील महिलांनी धाड टाकत तेथील अवैध दारू जप्त करून पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडले. महिलांनीच पुढाकार घेतल्यामुळे आधी कारवाईकडे कानाडोळा करणाऱ्या पोलिसांना मात्र कारवाई करण्यास भाग पडले. तालुक्यातील जोगेवाडी येथे एकदुकानावर महिलांनी छापा टाकत अवैध्य दारू पोलिसांना पकडून दिली.
दारुबंदी करावी या मागणीसाठी महिलांनी पोलिस निरीक्षक रत्नपारखी यांना पंचवीस दिवसांपूर्वी पाथर्डी येथे राष्तारोखो करत निवेदन दिले होते. अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी केली होती. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे जोगेवाडी व परिसरात अवैध दारू विक्री सुरुच होती.
त्यामुळे संतापलेल्या महिलांनी गुरुवारी दुपारी येथील मीरा बडे यांच्या नेतृत्वाखाली जोगेवाडी एथे दुकानावर छापा टाकला. तेथे दीड हजार रुपये रुपये किमतीच्या देशीविदेशी मद्याच्या 20 बाटल्या हस्तगत केल्या. पाथर्डी पोलिसांना फोन करत कारवाईस भाग पाडले. यावेळी सरपंच गंगुबाई आंबिलढगे, उपसरपंच सरस्वती आजीनाथ बडे,
वैशाली बडे, कुसुम ढाकणे, मनखाबाई सारूक, लताबाई सारूक, वैशाली गोरक बडे, शोभा बडे, उषा बडे, शहाबाई बडे आदिंसह २५ महिला उपस्थित होत्या. यावेळी बिटाचे पोलिस हवालदार आजीनाथ बडे यांनी मुद्देमाल ताब्यात घेत पंचनामा केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved