अहमदनगर शहरातील उड्डाणपूलाचे उदघाटन समस्त अहमदनगरांनी करावे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News: शहरातील बहुचर्चित उड्डाणपूल हा अहमदनगर शहरातील जनतेच्या रेट्यामुळे यशस्वी उभा राहिलेला आहे. त्यातल्या त्याच सोशल मिडीयावरील सक्रिय जनतेने त्यात प्राधान्याने पुढाकार घेतलेला होता.

शहरातील सामाजिक व राजकिय प्रक्रियेतील अनेक कार्यकर्ते यात सहभागी होते. त्यांनी याचा अनेक वर्षे विविध पातळ्यांवर मोठा पाठपुरावा केलेला आहे. शहरातील या सामान्य जनतेच्या रेट्यामुळे राजकीय पुढाऱ्यांना हा उड्डाणपुल करावा लागला आहे.

हे सत्य असूनही अनेक पुढारी पुलाचे श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत. या उड्डाणपुलाचे खरे श्रेय अहमदनगरमधील सामान्य जनतेचेच आहे. शहरातील जनतेनेच एकजूटीने या उड्डाणपुलाचे उदघाटन करावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सेक्रेटरी कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी केले.

बुधवार, दि. ९ रोजी दिवसभर शहरातील उड्डाणपूलाच्या प्रत्येक खांबाजवळ शहरातील जनतेने आपापला नारळ फोडून उदघाटन करत सोशल मिडीयावर सेल्फी व उदघाटन फोटो अपलोड करावा व उदघाटन झाल्याचे जाहीर करावे. कारण खरे श्रेय राजकीय लोकांचे नसून पाठपुरावा करणाऱ्या अहमदनगरकर जनतेचे आहे, असे ते पुढे म्हणाले.