अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- विकासाची नियोजन पूर्वक कामे होणे गरजेचे आहे.जेणेकरून ती कामे पुन्हा-पुन्हा करण्याची वेळ आपल्यावर येणार नाही याच दृष्टिकोनातून पाऊले उचली आहेत.
अत्याधुनिक ग्रेडेड मशीनद्वारे शहरातील रस्त्यांचे कामे दर्जेदार होणार आहे.भविष्यकाळात नगर शहर हे महाराष्ट्रात विकसित महानगर म्हणून ओळखले जाणार असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत शहरांमध्ये चालू असलेल्या वाडियापार्क रोड व रामचंद्र खुंट रस्त्यांच्या कामांची आ.संग्राम जगताप यांनी केली.
यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, जमिनीअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या लाईन,भुयारी गटार योजना,जमिनीअंतर्गत लाईटच्या विद्युत तारांचे कामे व रस्त्याच्या दोन्ही बाजूस साईट गटारांची कामे ही सर्व विकासात्मक कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहे.
सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे रस्त्यांची मंजूर कामे करता येत नाही याच बरोबर खड्डे बुजवण्यास मोठी अडचण निर्माण होते, पाऊस न आल्यास नगर शहरातील मंजूर कामे सुरू होतील व येत्या पंधरा दिवसात शहरातील रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्यात येणार आहे.
डांबरी रस्त्यांची कामे करीत असताना अत्याधुनिक ग्रेडेड मशीनचा वापर केल्यास रस्ता हा समांतर उंचीचा तयार होईल त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचणार नाही व रस्ता खराब होऊन खड्डे पडणार नाही त्यामुळे दर्जेदार कामे होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.