अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात गोदावरी नदीवर पूल उभारून व महत्त्वाचे रस्त्यांचे प्रश्न सोडवून मतदारसंघातील दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सोडवला.मात्र, मागील काही वर्षात रस्ते दुरुस्तीचा मोठा अनुशेष निर्माण झाल्यामुळे मतदारसंघाचा विकास खुंटला होता.
मतदारसंघातील अनेक रस्ते नकाशावर घेऊन त्या रस्त्यांना महाविकास आघाडी सरकारकडून निधी मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्माण करून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार आहे, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथे मुख्य लेखाशिर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत २५ लाख रुपये निधीतून सुनील भागवत घर ते किसन आभाळे घर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन तसेच १४ व्या वित्त अयोगातून दशक्रिया विधी परिसर सुशोभीकरण,
दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत भूमिगत गटार बांधणे, श्री साईबाबा सार्वजनिक वाचनालय व ग्रामसंघ महिला बचत गट कार्यालयाचे लोकार्पण नुकतेच आमदार काळे यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहनराव आभाळे होते.