अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- मार्चमध्ये सुरू झालेला करोना कहर दिवसागणिक वाढत गेला. खर्चिक उपचार घेणे परवडत नसल्याने महापालिकेने शहरात चार ठिकाणी मोफत सुविधा केंद्र सुरू केले.
तेथे करोनाग्रस्तांवर मोफत उफचार करण्यात आले. मात्र आता कोरोनाग्रस्तांची संख्या कमालाची घटल्याने महापालिकेने हे मोफत उपचार केंद्रच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने आता शहरात सुरु असलेले मोफत कोवीड उपचार केंद्र बंद केल्याने गरिबांचे मोठे हाल होणार आहे. मनपाच्या या निर्णयामुळे फुकटात मिळणारे कोरोना उपचार आता नगरकरांना यापुढे मिळणार नाहीत.
मात्र अत्यंत गरीब असेल अशांना मात्र सिव्हील हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार घेता येऊ शकतील अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
महापालिकेचे मोफत करोना उपचार केंद्र बंद झाल्याने आता खासगी हॉस्पिटलमध्ये पैसे मोजून नगरकरांना उपचार घ्यावे लागणार आहे.