अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- राज्य शासनाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या 108 रुग्णवाहिकेच्या धर्तीवर महापालिकेने दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरामध्ये वाढणाऱ्या करोनाचा संसर्ग पाहता महानगरपालिकेने सदर कारवाई केली आहे.
यात व्हेंटिलेटरसह सर्व तातडीच्या आरोग्य सुविधा असलेली 1 कार्डियाक रुग्णवाहिका आणि एक साधी रुग्णवाहिका अशा 2 रुग्णवाहिकांचा सोय करण्यात आली आहे.
यामुळे शहरातील कोणत्याही नागरिकाला करोनाची लक्षणे आढळल्यास व त्याची करोना तपासणीसाठी जाण्याची सोय नसल्यास त्यास रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे.
या सेवेस मंगळवारी सकाळी महापालिका मुख्यालयात प्रारंभ झाला. यावेळी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
एखादा व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळली, तिला करोनाच्या लक्षणांमुळे त्रास होत असेल तर तिला उपचारासाठी लवकरात लवकर दवाखान्यात नेता यावे, यासाठी महापालिकेने ही व्यवस्था केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews