शहरात बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळ्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देणार -आमदार संग्राम जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एक विचार व दिशा दिली. हे विचार आजच्या युवा पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांनी दिलेली समता व मानवतेचे शिकवण समाजाचा उध्दार करणारी आहे.

त्यांच्या कार्याची व विचाराची प्रेरणा मिळण्यासाठी शहरात बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाकडून योग्य जागा मिळवून, या पुतळ्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उबेद शेख, परिमल निकम, चर्मकार विकास संघाचे संजय खामकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, माजी नगरसेवक अजय दिघे, उपाध्यक्ष निलेश इंगळे, महादेव कराळे, एकनाथ भिंगारदिवे, मळू गाडळकर, संध्या मेढे, गणेश बोरुडे, अक्षय भिंगारदिवे, मनिष साठे आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा.माणिक विधाते यांनी दीन, दलित व दुर्बल घटकातील लोकांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केले. कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना खर्‍या अर्थाने मदत करण्याची गरज आहे. वंचितांसाठी कार्य करण्याची भावना प्रत्येकाने मनात ठेवल्यास हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24