अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :शहरासह उपनगरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सोडविणारी अमृतपाणी योजना महापालिकेतील नगरसेवकांचा नाकर्तेपणा व टक्केवारीच्या राजकारणाने बारगळली असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे.
अशा सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांचा निषेध नोंदवून लोकभज्ञाक सुर्यनामा जाहीर केला जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
शहराचा पाणी प्रश्न सोडविणार्या अमृतपाणी योजनेसाठी केंद्र सरकारने 135 कोटी रुपयाचे निधी दिले. ही योजना वेळेत कार्यान्वीत झालेली नाही. या योजनेमुळे भविष्यातील 10 ते 15 वर्षाचा पाणी प्रश्न सुटणार होता.
मात्र सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांच्या नाकर्तेपणामुळे ही योजना बारगळली. या योजनेचे काम अर्धवट सोडून ठेकेदाराने देखील पळ काढला आहे.
नगरसेवक फक्त टक्केवारीच्या कामात गुंतले असून, अनेक नगरसेवकांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी पाणी विक्रीचे धंदे सुरु केले आहेत. सर्वसामान्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही.
तर दुसरीकडे पाण्यावर पैसे कमविण्याचे व्यवसाय शहरात सुरु झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. मत खरेदी करुन निवडून येणार्या नगरसेवकांमुळे वाईट दिवस आले आहेत. काही कामाचा निधी आल्यास सत्ताधारी व विरोधक त्याच्यावर तुटून पडतात. शहरातील जनता शोषित असून, संघटनेच्या वतीने लोकभज्ञाक शासन पध्दतीचा आग्रह धरला जाणार आहे.
वेबीनार घेऊन लोकभज्ञाक सुर्यनामा जाहीर केला जाणार आहे. यामध्ये अनेक स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
शहरासह उपनगरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अॅड. गवळी, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ.बाबा आरगडे, जागृक नागरिक मंचचे सुहास मुळे, शशीकांत चंगेडे, वीरबहादूर प्रजापती, अशोक सब्बन, प्रा.कॉ.महेबुब सय्यद, शाहीर कान्हू सुंबे आदि प्रयत्नशील आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews