अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : शेवगाव तालुक्यात २५ वर्षाच्या मुलाशी अवघ्या ११ वर्षे वयाच्या मुलीचा बालविवाह होणार होता मात्र पोलिसांना याची माहिती कळताच या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शेवगाव तालुक्यातील हसनापूर येथील नवरदेव आहे. तो २५ वर्षे वयाचा आहे. तर मुलगी शिरापूर (ता.पाथर्डी) येथील आहे. मुलीचे वय अवघे ११ वर्षाचे आहे.
सदर मुलगी ही खुंटफळ येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत आहे.या मुलीचा साखरपुडा (दि.६ जून) रोजी शिरापूर येथे मुलीच्या आत्याच्या घरी झाला होता.
मुलीचे आई, वडील ऊस तोडणी कामगार आहेत. या बालविवाहाची माहिती पोलिसांना समजताच रविवारी पोलीस विवाहस्थळी दाखल झाले.
दरम्यान वधू-वरांकडील दोन्ही नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी रात्री उशीरा याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews