अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नगर तालुक्यातील माणगाव शिंदे परिसरात राहणारी शेतकरी महिला नंदाबाई पुंजा उगले या दीर चांगदेव उगले यास म्हणाल्या की, विहिरीचे पाणी दोन दिवसापासून तुम्ही घेत आहात आम्ही आमच्या ग्वाहाला तणनाशक खत मारले आहे.
असे म्हटल्याने जाव दुर्गा ही नंदाबाई यांना शिवीगाळ करू लागली तेव्हा नंदाबाई पुंजा उगले, जाव दुर्गा चांगदेव उगले हिला म्हणाली की, तू मध्ये बोलू नका, असे म्हटल्यानेपुतण्या नवनाथ याने त्याच्या हातातील कुऱ्हाड पुंजा उगले या चुलत्याच्या डोक्यात कुऱ्हाड मारुन डोके फोडले.
तर दुर्गा उगले हे जाव नंदाबाई हिला हाताला कडकडून चावलो. तुम्ही जर विहिरेवर आले तर तुम्हाला जिवंत मारुन टाकू, अशी धमकी दिली.
काल ९.३० वा. हा प्रकार घडला. जखमी नंदाबाई पुंजा उगले या महिलेच्या फिर्यादीवन आरोपी नातेवाईक दुर्गा चांगदेव उगले, चांगदेव रामकिसन उगले, नवनाथ चांगदेव उगले, सर्व रा. नांदगाव शिंगवे, ता. नगर यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोना नाकाडे हे पुढील तपास करीत आहेत.