अहमदनगर बातम्या

लिंबाचे झाड तोडू नको म्हणल्याच्या राग आल्याने ब्राह्मणगाव येथे वयोवृद्धास मारहाण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2021 :-   बांधावरील लिंबाचे झाड तोडू नको. असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघां जणांनी मिळून एका वयोवृद्ध इसमाला लोखंडी पाईप,

काठी व दगडाने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे घडली असून याबाबत मंगळवार 7 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भानुदास बबन माळी वय ६० वर्षे, धंदा शेती राहणार ब्राम्हणगांव भांड ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ६ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान भानुदास माळी यांच्या शेतात गेले होते.

त्यावेळी आरोपी हे सामाईक बांधावर असलेले लिंबाचे झाड तोडत असताना दिसले. तेव्हा भानुदास माळी यांनी आरोपींना झाड तोडण्यास मज्जाव केला.

याचा राग आल्याने आरोपींनी भानुदास माळी यांना लाकडी काठी, लोखंडी पाईप व दगडाने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेत भानुदास माळी हे जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे फिर्यादीत म्हटले आहे.

भानुदास बबन माळी यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी भरत काशिनाथ माळी, नितीन भरत माळी, सचिन भरत माळी (सर्व राहणार एकलहरे ता. श्रीरामपुर )यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office