अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-बेशिस्त वाहनचालकांमुळे नेहमीच अपघात घडत असतात. दरम्यान या वाहनचालकांचा त्रास आता पायी चालणाऱ्या नागरिकांना देखील सहन करावा लागतो आहे.
शहरातील एका रस्त्याने पायी जाणार्या वृद्धाला स्कार्पिओने धडक दिली. या धडकेत वृद्ध जखमी झाला आहे. नारायण माधवराव राऊत (वय 72 रा. नवनागापूर) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
नगर- मनमाड रोडवरील इंडीया वाईन्स समोर हा अपघात झाला. स्कार्पिओ चालक सुनील रामदास केदार (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी नारायण राऊत यांचा मुलगा रवींद्र नारायण राऊत (वय 42 रा. नवनागापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
नारायण राऊत नगर- मनमाड रोडवरून पायी जात असताना इंडीया वाईन्स समोर राऊत यांना स्कार्पिओने पाठीमागून धडक दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सय्यद करीत आहे.