अहमदनगर बातम्या

या तालुक्यात आढळून आला अज्ञात मृतदेह; खून की आत्महत्या?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- कोपरगाव तालुक्यातील संवत्सर काळा माथा परिसरात वनजमिनीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान याप्रकरणी कोपरगाव येथील परिमंडळ वन अधिकारी भाऊसाहेब संपत गाढे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत सरकारी वन जमिनीत काळा माथा या ठिकाणी एका 40 वर्षिय इसमाचा मृतदेह आढळला आहे.

असे आहे मृतदेहाचे वर्णन तो सडपातळ असून डोक्याचे केस काळे, दाढी वाढलेली असून त्याच्या अंगावर पांढर्‍या रंगाचा शर्ट,काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

हा खून आहे की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. शहर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.

Ahmednagarlive24 Office