अज्ञात समाजकंटकाने सोयाबीन दिले पेटून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-ज्ञानेश्वर लिंबाजी लांडे या शेतकरीऱ्याने तीन एकरातील सोयाबीन सुमारे ४० पोते रचून ठेवले होते. या सोयाबीनला अज्ञात समाजकंटकाने आग लावल्याची घटना अकोले तालुक्यात घडली आहे.

या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, अकोले तालुक्यातील वाघापूर येथील शेतकऱ्याच्या सोयाबीनला २३ तारखेला रात्री बाराच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले.

यात सव्वा लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचा हा तांडव पाहून ज्ञानेश्वर व त्याची पत्नीच्या डोळ्यात अक्षरश पाणी दाटून आले. डोळ्ययादेखत सगळं जाळून खाक झाले आता खायचे काय नि जगायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

कोरोनाचे संकट, त्यात रोजगार नाही अशातच काही समाजकंटकाकडून अशा प्रकारचा त्रास बळीराजाला दिला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोनाच्या या महामारीत आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्याला आता मदतीची अपेक्षा आहे.

दरम्यान अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक ही आग लावल्याचे उघडकीस आले. अकोले तहसीलदार यांनी पंचनामा करून नोंद घेतली आहे. अकोले पोलिसांकडे गुन्ह्याची तक्रार देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24