अज्ञात चोरट्याने विहिरीतील वीजेच्या मोटार केली लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील विहिरीतील पाणबुडी तसेच नदी काठावरील पाणबुडी चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नुकतेच असा प्रकार घडला आहे.

राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील शेतकरी देविदास देसाई यांच्या वीजेच्या मोटारीची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संक्रापूर येथील शेतकरी देविदास देसाई यांनी राहुरी पोलिसांकडे दिलेल्या

फिर्यादीत म्हटले आहे की, माझे संक्रापूर येथील शेतातील विहिरीतून २७ जानेवारी ते २८ जानेवारी रोजी रात्री १ ते ६ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विहिरीतील ५ हॉर्स पॉवरची पानबुडी तसेच १२५ फुट केबलची चोरी करुन अंदाजे ८ हजार रुपयांचे नुकसान केले आहे.

याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगाव पोलिस पुढील तपास करत आहेत. दरम्यान चोरलेली वीज मोटार भंगारात विकली जात असून मोटार चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

चोरीचा तपास लागत नसल्यामुळे शेतकरी आता तक्रारी देण्याचेच टाळत आहेत. पोलिसांनी वीज मोटार चोरणारे व त्या विकत घेणारे अशा दोघांवरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24