Ahmednagar News : सध्या भुरटे चोरटे कोणती वस्तु चोरतील याचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. कर्जत तालुक्यात असाच प्रकार समोर आला आहे. येथील नांदणी नदीवर नदीचा प्रवाह मोजण्यासाठी बसवण्यात आलेल्या प्रवाहमापक यंत्राचीच अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील नांदणी नदी पात्रात वायसेवाडी गावाच्या शिवारात नदीच्या प्रवाहाची नोंद घेण्यासाठी एका कंपनीकडून प्रवाहमापक यंत्र बसवण्यात आले होते.
मात्र दि.६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्याने या प्रवाह मापक यंत्राचे सोलर प्लेट, बॅटरी, मोडेम, सोलर चार्जर, डाटा लॉगर, त्याची लोखंडी पेटी व ब्रॅकेट आदी साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी श्रीनाथ काशिनाथ कळमणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा बावला आहे.