अहमदनगर बातम्या

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर मानधनापासून वंचित

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीचा चौथा टप्पा नुकताच पार पडला. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक कर्मचारी म्हणून कर्तव्य बजावलेल्या अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी चोख कर्तव्य बजावूनही त्यांना मानधनापासून वंचित ठेवल्याचा प्रकार घडल्याने केंद्रीय निवडणुक आयोगाचा समान नियम असतानाही जिल्ह्यातील या कर्मचाऱ्यांना मानधनापासून वंचित ठेवल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणूकीसाठी शासकिय व निमशासकिय अस्थापनेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ति केली जाते. निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीनुसार त्यांना मानधन देत असते. त्यात मतदान केंद्राध्यक्ष १, मतदान अधिकारी ३, शिपाई १, पोलीस कर्मचारी १, होमगार्ड १,

केंद्रस्तरीय आधिकारी (बी.एल.ओ) १, आंगणवाडी सेविका १ व आशा वर्कर १, अशी नियुक्ती यंदाची लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. यात मतदान केंद्राध्यक्ष १७०० रुपये, मतदान अधिकारी १३०० रुपये, पोलीस कर्मचारी ८०० रुपये, शिपाई ७०० रुपये,

बी.एल.ओ. ८०० रुपये, आंगणवाडी सेविका ३५० रुपये व आशा वर्कर ३५० रुपये मानधन निवडणूक आयोगाकडून निश्चित करण्यात आलेले आहे. हे सर्व कर्मचारी खांद्याला खांदा लावून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडीत आसतात.

मात्र नुकत्याच अहमदनगर जिल्ह्यात पार पडलेल्या या निवडणुकीत आंगणवाडी सेविका, आशा वर्कर व बी.एल.ओ. यांना मानधनापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. वास्तविक या तिन्ही कर्मचाऱ्यांनी सकाळी ६ ते सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चोख कर्यव्य बजावलेले आहे.

केंद्रिय निवडणूक आयोगाची देशात एकच नियमावली असली तरी मानधन वाटपात जिल्ह्यात मानधन देण्यात भेदभाव कसा केला जातो? हा प्रश्न या वंचित कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

मागील टप्यात झालेल्या निवडणूकांमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात आलेले आहे. मग नगर जिल्ह्यातच असा भेदभाव का? आसा सवाल या वंचित कर्मचाऱ्यांनी केला असून प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी बी.एल. ओ., पाळणा घरासाठी आंगणवाडी सेविका व आरोग्य विषयक अडचणीसाठी आशा वर्कर सकाळी ६ वाजल्यापासून नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर तळ ठोकुण होत्या.

मतदानास येणाऱ्या मतदारांच्या समस्या ते सोडवित होते. मात्र सरत्याशेवटी त्यांना निवडणूक कर्मचारी म्हणून मानधन मिळणार नसल्याचे समजताच या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Ahmednagarlive24 Office