उपोषणाच्या निर्णयावर अण्णा ठाम; भाजप नेत्याची पळापळ झाली सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण करणार आहेत.

त्यामुळे हजारे यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे.आज भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हजारे यांची भेट घेतली आहे.

आज भल्या सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले. याअगोदरही दोनदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती.गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांच्यातली बैठक संपली आहे.

अण्णांनी आंदोलन करु नये अशी विनंती महाजन यांनी अण्णांना केली आहे.उद्या केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णांची भेट घेणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.

केंद्रातील भाजप सरकारविरोधात हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.अण्णांच्या या इशार्‍यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे.

दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24