अण्णा पाठिमागे पळत आला..दरवाजा तोडून घरात घुसला..तो फाशी देऊन टाकणार होता नदीत..अण्णा वैद्य प्रकरणात नेमकं काय घडलं? मुलीने सांगितला आपबीतीचा थरार..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा अकोलेतील अण्णा वैद्य प्रकरणामुळे राज्यात गाजला. मुलीची छेड काढल्याने जमावाने केलेल्या हल्ल्यात मच्छिंद्र उर्फ अण्णा वैद्य (वय ५८) ठार झाला. त्याच्यावर या आधीही महिलांना मारून पुरून टाकल्याचा आरोप होता. आता या घटनेनंतर सदर पीडितेने आपबिती सांगितली आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडिता तिच्या मैत्रिणीकडे चालली होती. अण्णा वैद्य याच्या घरासमोरून जाताना त्याने हाक मारली असत ती घाबरून तिच्या घराकडे पळाली. अण्णा देखील तिच्या मागोमाग पाठलाग करत आला.

तिने घरात जाऊन घराचा दरवाजा लावून घेत आत जाऊन बसली. त्याने लाथा मारून घराचा दरवाजा तोडला आणि तिला तिचे केस धरून बाहेर ओढत घेऊन आला. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत खांबावर आपटले. तिला सोडवायला काही महिला,

मुली धावल्या पण त्याने त्यांनाही दम दिला. त्याने तिला ओढत त्याच्या घरापर्यंत घेऊन आला होता,तुला फाशी देऊन लाकडाला बांधून नदीतच फेकतो असे तिला धमकावले. आरडाओरड ऐकून तेथे मोठा जमाव जमा झाला.

त्यातील एकाने वैद्य याला धक्का देऊन पीडितेला वाचविले अशी थरारक आपबिती तिने वर्तवली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून वैद्य याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वैद्य याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यामुळे गावातील ७ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समजली आहे.

वैद्यचा इतिहासही आहे थरारक

विद्युत मोटार केबल चोरी प्रकरणात पोलीस तपास करत असताना त्याने चोरलेल्या केबल शेतात पुरुन ठेवल्या होत्या असे समजल्यानंतर त्या शोधताना पुरलेले मानवी मृतदेह आढळून आले होते. येथूनच त्याचे क्रौर्यकर्म समोर आले होते.

आण्णाची सख्खी बहीण अंगणवाडी सेविका शशिकला गोर्डे (पानसरवाडी), शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याची मावस बहीण कमल कोल्हे (घांदरफळ), संगमनेर माळीवाडा येथील भाजी विक्री करणारी ताराबाई आसाराम राऊत, कुंभेफळ येथील विडी कामगार महिला पुष्पा देशमुख या महिलांचे अपहरण व खून असे आरोप आण्णा वैद्य याच्यावर होते.