अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :- पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वत वापर यासाठी व्यक्तिगत पातळीवर दिला जाणारा प्लांट जीनोम सेव्हीयर फार्मर रिवॉर्ड हा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा मानाचा पुरस्कार अकोले तालुक्यातील अन्नमाता म्हणून प्रसिद्ध असेलल्या ममताबाई देवराम भांगरे यांना मिळाला आहे.
नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात भारताचे कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीड लाख रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरम्यान गेली 20 हून अधिक वर्षे ममताबाई यांनी स्थानिक बियाणे संवर्धन आणि वृद्ध यासाठी भरीव कार्य केलेले आहे. याची देशपातळीवर दखल घेतली गेली. लाल रंगाचा लसूण, लांब व आरोग्यास पोषक असलेला दुधीभोपळा,
डांगर भोपळा, मोहरी, भुईमूग, मका, विविध प्रकारचे परसबागेत लागवड योग्य भाजीपाला पिके, तेलबिया, डाळवर्गीय पिके यांच्या पारंपरिक वाणांचे संवर्धन केले आहे.
तसेच त्यांनी अकोले तालुक्यात सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित करताना त्यांनी गांडूळ खतापासून बनविलेल्या गोळ्या व गांडूळ खत वापरून बनवलेले
सीडबॉल शेतकर्यांसाठी वरदान ठरलेले आहे. त्यांचा हा प्रयोग देशभर गाजला. हा पुरस्कार त्यांना मिळाल्यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.