अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक किसन वाबळे व डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी निळकंठ वाघमारे, दतात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, काशीनाथ पळसकर, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक किसन वाबळे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाने आजची स्त्री सक्षम व कर्तृत्ववान बनली आहे. स्त्री शिक्षणाने समाजाची प्रगती साध्य झाली. आजच्या पिढीला सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार समजण्याची गरज असून, आजच्या प्रत्येक युवतीने सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन शिक्षणाने आपले ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले.
पै. नाना डोंगरे यांनी स्त्री शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करणार्या सावित्रीबाईंचे कार्य आजही दीपस्तंभासारखे आहे. प्रवाहा विरोधात जाऊन त्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य केले. आजची कर्तुत्ववानस्त्रीचे श्रेय सावित्रीबाईंना जात असल्याचे त्यांनी सांगितले.