अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- जगावेगळं पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एका क्रूर पतीने चक्क आपल्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात पती सोमनाथ कदम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा धक्कादायक प्रकार राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे घडला आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, कदम हे कुटुंबीय राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे राहते. आरोपी सोमनाथ कदम याने त्याची पत्नी हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात लोखंडी नळीने मारून जखमी केले.
तसेच पाठीवर कंबरेवर, पोटावर मारून जखमी करण्यात आले. शिवीगाळ करण्यात आली. तुला व मुलांना मारून टाकीन व मी देखील आत्महत्या करील अशी धमकी दिली. यावरून या महिलेने राहुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
यावरून तिचा पती सोमनाथ दादा कदम याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक डी. आर. चव्हाण हे करीत आहे.