अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-पत्रकार पांडुरंग रायकर यांचं सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. खरं तर पांडुरंगच्या निधनानंतर सरकार खडबडून जाग झालं पण पांडुरंग हा निर्ढावलेल्या व्यवस्थेचा बळी ठरला होता.
त्या धक्क्यातून कुटुंब आणखी सावरल नव्हत तोच रायकर कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. पांडुरंग रायकर यांचे वडील लक्ष्मण रायकर यांचे कोरोनाने निधन झालं आहे. अहमदनगर शहरातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर उपचारादरम्यान आज सकाळी आठ वाजता त्यांच निधन झाले आहे.
लक्ष्मण रायकर श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी सून आणि तीन मुली असा परिवार आहे. पांडुरंग रायकर यांना जाऊन चार महिनेही पूर्ण होत नाहीत तोपर्यंतच रायकर कुटुंबावर दुसरा मोठा आघात झाला आहे.
टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. पुण्यासारख्या शहरात आपल्या शांत आणि संयमी पत्रकारितेने त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला होता.