अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-कर्जत तालुक्यातील कुळधरण जवळील सुपेकरवाडीतील शेतकरी बिभीषन अंबादास सुपेकर यांनी आपल्या तीन एकरमध्ये फ्लॉवरची लागवड केली होती.
मात्र सध्या फ्लॉवरला भाव नसल्याने या सर्व पिकावर त्यांनी रोटर मारला. बिभीषन सुपेकर यांनी आपल्या शेतात तीन एकर फ्लॉवर लावला होता.
यासाठी त्यांना एकरी वीस हजार रुपये खर्च खर्च आला होता, आपला खर्च निघून दोन पैसे हातात राहतील असा विश्वास त्यांना होता.
मात्र सध्या नेमक्या फ्लॉवर विक्रीच्या वेळेतच याचे भाव पडले, सध्या दोन ते तीन रुपये खर्च किलो भाव मिळत असल्याने यात सुधारणा होण्याचे चिन्ह दिसत नसल्याने अखेरीस सुपेकर यांनी आपल्या शेतातील फ्लॉवरच्या उभ्या पिकात जड अंतकरणाने रोटरच घातला व सर्व पीक जमीन दोस्त करून टाकले.
शेतात काम पीक घेणे शेतकऱ्याच्या हातात आहे की मात्र त्याला भाव किती मिळणार हे मात्र त्याच्या हातात नसल्याने शेतकरी अनेकदा हतबल होत आहे
की त्यामुळे शासनाने याबाबत सकारात्मक विचार करावा व शेतकऱ्याला जगण्याची आस राहील अशी धोरणे आखावीत अशी मागणी यानिमित्ताने शेतकरी वर्गातून केली जात आहे.