अहमदनगर मध्ये देशविरोधी घोषणाबाजी ! आणखी एकाला अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : भुईकोट किल्ल्यात स्वातंत्र्यदिनी देशविरोधी घोषणाबाजी केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. जईद रशिद सय्यद (वय ३६, रा. मुकुंदनगर) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.

आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. भुईकोट किल्ला स्वातंत्र्यदिनी सामान्य नागरिकांसाठी खुला होता. त्यावेळी तिथे चार ते पाच जणांनी देशविरोधी घोषणाबाजी केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांसह तीन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

त्यांच्याकडून जईद रशिद याचे नाव उघड झाले. भिंगार कॅम्प पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला शुक्रवारी अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.