अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- नगर शहरात प्लास्टिकविरोधी कारवाईची मोहीम जोमात सुरू आहे. या कारवाईला काही प्लास्टिक व्यावसायिकांनी आक्षेप घेतला आहे.
तथापि, कारवाई सुरूच राहणार असल्याचे घनकचरा विभागप्रमुख डाॅ. नरसिंग पैठणकर यांनी स्पष्ट केले. नगर शहरात दोन दिवसांपासून प्लास्टिक विरोधी मोहीम मनपाने सुरू करून दंडात्मक कारवाई सुरू केली.
ही कारवाई करताना कोणते प्लास्टिक खुले आहे किंवा कोणत्या प्लास्टिकला बंदी आहे याबाबत मनपाच अनभिज्ञ असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला.