चिंता वाढली; ‘ह्या’ तालुक्यात कोरोना बाधितांनी ओलांडले शतक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

तालुक्यात बुधवारी सकाळी १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यात आता कोरोना बाधितांची संख्या ११० झाली आहे.

तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ४१ आहे. आज आलेल्या १४ लोकांच्या अहवालात तालुक्यातील माणिक ओझर येथे १० तर राजुरला दोन, वाघापुर एक व निंब्रळ येथील एकाचा समावेश आहे.

माणिक ओझर येथील ४२, ३४, ३३ व २२ वर्षीय पुरुष ६०,४८ व ३७ वर्षीय महिला व १४, ०५ व ०१ वर्षीय लहान मुले तर तर राजुर येथील ६० व ३० वर्षीय पुरुष, वाघापुर येथील ४५ पुरुष व निंब्रळ येथील २१ वर्षीय तरुणाचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24

 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24