अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : नुकतेच राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे बँक अधिकारी महिलेसह चौघांना कोरोना झाल्याने खळबळ उडाली होती. परंतु त्यांच्या संपर्कातील लोकांचे अहवाल निगेटिव्ह येऊ लागल्याने
दिलासा मिळाला असतानाच गावातील मुसळे वस्ती भागात कर्करोगग्रस्त वयोवृद्ध महिला शनिवारी कोरोना बाधित आढळल्याने लोणीकरांची चिंता वाढली आहे.
मुसळे वस्ती भाग आज प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. कोरोनाबाधित महिला कर्करोगग्रस्त असल्याने तिच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र तिच्यामध्ये काही लक्षणे आढळून आल्याने प्रवरा कोव्हिड सेंटरमध्ये तिच्या घशातील स्राव घेऊन तपासणी केली असता ती कोरोना बाधित आढळून आली.
या महिलेचे कुटुंब आणि आजूबाजूच्या काही लोकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. आणखी काही व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.
15 जुलैपर्यंत दोन्ही लोणी गावे लॉकडाऊन करण्यात आली असून रुग्णांची संख्या वाढल्यास लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews