अहमदनगर Live24 ,21 मे 2020 :- नगर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नगर तालुक्यामधील कामरगाव शिवारातील
हॉटेल स्माईल स्टोनजवळ सुरेश चंद्रभान ठोकळ यांचे शेततळेमध्ये
दिनांक 18 मे 2020 रोजी बेवारस अनोळखी पुरुषाचे प्रेत तरंगतांना आढळून आले आहे.
या इसमाचे अंदाजे वय 30 वर्षे असून बेवारस मयत पुरुषाच्या नातेवाईकांचा शोध लागला नाही.
या अनोळखी इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी नगर तालुका पोलिस स्टेशन,
अहमदनगर येथे कळविण्यात यावी. असे सहाय्यक निरीक्षक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे .
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com