केंद्र शासन आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर खरेदी करीता नोंदणी करण्यासंदर्भातील आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी हनुमंत पवार यांनी केले आहे.
जिल्ह्यात २८ डिसेंबर, २०२० पासूनच तूर खरेदी संदर्भात शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यासाठी जिल्ह्यात एकूण १३ खरेदी केंद्रे प्रस्तावित असून ११ खरेदी केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
शेतमाल नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी पीक पेराचा उल्लेख असलेला 8अ, सात बारा उतारा, आधारकार्डाची छायांकित प्रत, बँक पास बुकची छायाप्रत सादर करणे आवश्यक आहे.
बँक पास बुकची छायांकित प्रत सादर करताना रद्द केलेला धनादेश अथवा बँक खात्याबाबत पूर्ण माहिती असलेले बँक स्टेटमेंट सादर करावे. सदरहू बँक खाते बंद अथवा जनधन योजनेतील नसावे याची दक्षता संबधितांनी घ्यावी.
ज्या तालुक्यातील क्षेत्र आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतकर्यांनी नोंदणी करावी. या केंद्रावर तूर ६ हजार रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.
जिल्हयातील नोंदणी/खरेदी केंद्र व केंद्रावरील भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहे. राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, राहुरी (भ्रमणध्वनी क्रमांक 9665722815). संगमनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, संगमनेर (भ्रमणध्वनी क्रमांक 9850319568).
श्रीगोंदा तालुका आरोही बहुउद्देशीय सह संस्था, श्रीगोंदा (भ्रमणध्वनी क्रमांक 9011957878). कर्जतकर फार्मर प्रोडुयसर कंपनी, कर्जत (भ्रमणध्वनी क्रमांक 9503031010). यशवंत मल्टीपर्पज को ऑप सोसायटी, जामखेड (भ्रमणध्वनी क्रमांक 7218412412), शिवरत्न मल्टीपर्पज को ऑप सोसायटी,
खर्डा ता.जामखेड (भ्रमणध्वनी क्र. 9422200001). जयभगवान मल्टीपर्पज को ऑप सोसायटी, पाथर्डी (भ्रमणध्वनी क्रमांक 8329404135). शेवगांव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, शेवगांव (भ्रमणध्वनी क्रमांक 9011541646).
कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदनगर (भ्रमणध्वनी क्रमांक 9021202301). साकत, ता. नगर श्रीराम बी बीयाणे उत्पादक कंपनी, साकत (भ्रमणध्वनी क्रमांक 8275391207). मांडवगण, ता. श्रीगोंदा जय किसान बहुउद्देशीय सह संस्था (भ्रमणध्वनी क्रमांक 9422223719)