अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून देशभर कृषी विधेयक आंदोलनांवरून रान पेटलेले आहे. याचा निषेध म्हणून अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान दिल्लीच्या किसान आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला, तरीही केंद्र सरकारने आपला निर्णय बदलला नाही. सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी रविवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात’ कार्यक्रमावेळी टाळ्या-थाळ्या वाजवून विरोध करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समितीने घेतला.
केंद्र सरकारने तीन काळे कृषी कायदे रद्द करावे, शेतमालाला हमी भाव द्यावा या मागण्यांसाठी कडाक्याच्या थंडीत दिल्लीत आंदोलन सुरू आहे. ३३ शेतकऱ्यांचे आंदोलनादरम्यान प्राण गेले.
आंदोलकाशी संवाद करण्याऐवजी मोदी, कृषिमंत्री किसान आंदोलनाची बदनामी करत आहे. तालुक्यात ‘मन की बात’ कार्यक्रम सुरू असताना शेतकरी व आंदोलन समर्थकांनी टाळ्या-थाळ्या वाजवून विरोध करावा, असे आवाहन किसान संघर्ष समितीचे संयोजक प्रा. शिवाजी गायकवाड यांनी केले आहे.