व्यवसाय सुरु करण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु बऱ्याचदा पैसे कमी पडतात अन सगळ्या इच्छा जागेवर राहतात. परंतु अशा इच्छुकांसाठी शासनाच्या अनेक योजना असतात.
तुम्हाला अनेक योजनाही माहिती असतील. आज याठिकाणी आपण संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाकडून व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या ५० टक्के अनुदानाबाबत जाणून घेऊयात.
संत रोहिदास मंडळाचे ५० टक्के अनुदान
एनएसएफडीसीमार्फत ५ लाखांपर्यंत मुदतीची कर्ज योजना सुरू आहेत. यासाठी लघु व्यवसायाला १.४० लाखापर्यंत लघुऋण वित्त योजना, १.४० लाखापर्यंत महिला समृद्धी योजना आणि पाच लाखांपर्यंतच्या महिला अधिकारिता योजना सुरू आहेत.
कधी होईल अर्ज प्रक्रिया सुरु
अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आहेत योजना
५० टक्के अनुदान, बीजभांडवल, गटई स्टॉल, मोफत प्रशिक्षण, केंद्र सरकारच्या एनएसएफडीमार्फतच्या योजनांमध्ये मुदत कर्ज, छोटे उद्योग, चर्मोद्योग, महिला समृद्धी, शैक्षणिक कर्ज योजना तसेच काही नवीन योजना.
कुणासाठी आहे ही योजना?
चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार, मोची आदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तीसाठी ही योजना आहे. योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात येते.
काय आहेत निकष ?
– अर्ज करणारा हा चर्मकार समाजातील चांभार, ढोर, होलार, मोची समाजाचा आणि राज्याचा रहिवासी असावा.
– १८ ते ५० वर्षांपर्यंत लाभार्थीचे वय असले पाहिजे. वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या आत असावे.
व्यवसायास हातभार
व्यवसायाच्या अनुशंघाने कुणाकडे कल्पना असेल, प्लॅनिंग असेल तर केवळ पैशावाचून हे काम अडणार नाही. व्यवसायास हातभार लागेल.