अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-राज्य शासनाने चालू वर्षीही कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राबवण्याचे ठरवले असून या अभियानाचे अंमलबजावणी साठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली असून या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे.
त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाच्या महाडीबीटी महा आयटीआय या संकेतस्थळावर तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले
आहे. ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुदान मर्यादा राहणार असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे ट्रॅक्टर, रोटावेटर, पावर टिलर,
पेरणी यंत्र, कल्टीवेटर, ट्रॅक्टर फवारणी यंत्र, मळणी यंत्र, मोगडा, पाचट कुट्टी, रिपर बाईंडर, मल्चर आदी अवजारांची नोंदणी करता येईल.
नेवासा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून अनुदानावर आधारित या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री गडाख यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved