एमआयएमच्या अहमदनगर शहर पदाधिकार्‍यांची नियुक्ती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- एम.आय.एम. पक्षाची अहमदनगर जिल्हा कार्याकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा होऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्यात पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करण्याच्या ठरविण्यात आले.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सरफराज जहागिरदार यांनी अहमदनगर शहराची नूतन पदाधिकार्‍यांची निवड जाहीर करण्यात आली.

यामध्ये शहर कार्याध्यक्षपदी मतीन नाजमोहंमद शेख, शहर महासचिव शहेबाज इकबाल शेख (बॉक्सर), शहर युवा अध्यक्षपदी आमीर नासीर खान, भिंगार शहराध्यक्षपदी वसीम सुलेमान खान, अहमदनगर शहर सचिवपदी शेख मुस्ताफा समद, मोहम्मद उफेर राजू शेख, नाफेउद्दीन हाफिजोद्दीन सय्यद,

सहसचिवपदी सनाउल्लाह इक्राम खान (तांबटकर), शेख रईस नुरमोहम्मद, असद आदम शेख, हाफिज उमेर आदम शेख, शेख शाहिद मुनीर आदिंची निवड करुन पत्र देण्यात आले.

याप्रसंगी सरफराज जहागिरदार म्हणाले, एमआयएम पक्षाचे प्रमुख बॅ.असुद्ुद्दीन ओवेसी यांच्या विचारांचा वारसा तसेच पक्षाचे खासदार व प्रदेशाध्यक्ष इम्तीयाज जलील व महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ.गफ्फार कादरी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरु आहे.

पक्षाच्यावतीने सर्वसामान्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. नूतन पदाधिकार्‍यांनीही समाजातील प्रश्‍नांना प्राधान्य देऊन पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन करुन शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24