अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- सामाजिक कार्यकर्ते साहेबराव शंकर काते यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
गांधी मैदान येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पद नियुक्ती कार्यक्रमात काते यांच्या नियुक्तीची घोषणा करुन अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी वाल्मिक निकाळजे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, राज्य सचिव मनेष साठे, विवेक नाईक, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. साहेबराव काते मागासवर्गीय समाजाच्या विकासात्मक कार्यात मागील 20 वर्षापासून कार्यरत आहेत.
त्यांनी अनेक आंदोलने, चळवळ विविध सामाजिक विषयांवर समाजातील प्रश्न मांडून, सदर प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. तसेच मागासवर्गीय समाजातील गरजू कुटुंबातील व्यक्तींना जातीचे दाखले, वैद्यकिय मदत, रेशन कार्ड, महामंडळाचे कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा करुन त्यांनी लाभार्थींना लाभ मिळवून दिला आहे.
तसेच केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना तळागाळा पर्यंत पोहचविण्याचे कार्य ते करीत आहे. मागासवर्गीयांचे कर्ज माफ होण्यासाठी ते शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहे. यापुर्वी भाजप दलित आघाडीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे. भाजपचे विचार व कार्य शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांचे कार्य सुरु आहे.
या कार्याची दखल घेत त्यांची अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसूचित समाजाला भाजप पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे. समाजाच्या उध्दारासाठी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना गरजू घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य सुरु आहे.
पक्षाच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी योगदान देऊन पक्षाची ध्येय-धोरण शेवटच्या घटका पर्यंत पोहचविणार असल्याची भावना साहेबराब काते यांनी व्यक्त केली.