अहमदनगर बातम्या

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

Published by
Ahmednagarlive24 Office

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व आजूबाजूच्या गावांतील तरूण, सरकारी कर्मचारी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी,महिला यांसह मोठया संख्येने लोक काम,

व्यवसाय, शासकीय सेवा आणि शिक्षणासाठी नगर ते पुणे दरम्यान नियमितपणे ये-जा करतात. या प्रवाशांना रस्त्याने प्रवास करताना विशेषतः प्रचंड वाहतूक कोंडी आणि बसेसमध्ये जास्त गर्दी यामुळे मोठया समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या सोडविण्यासाठी नगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करणे आवष्यक असल्याचे खा. लंके यांनी संसदेत बोलताना स्पष्ट केले होते.

नगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू झाल्यास निःसंशयपणे दोन्ही शहरांमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या विविध श्रेणीतील प्रवशांना फायदा होईल. याशिवाय माल वाहतूक, बोगी वाहतुकीच्या उद्देशाने रेल्वेला जोडल्यास त्यातून रेल्वेस उत्पन्न मिळले.

कारण नगर आणि परिसरातील अनेक व्यापारी पुण्यातून माल खरेदी करतात आणि त्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी या सेवेचा वापर करू शकतात. त्यामुळे नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन ट्रायल आणि रन तत्वावर सुरू करण्यात यावी अशी मागणी खा. लंके यांनी संसदेमध्ये केली होती.

Ahmednagarlive24 Office